मराठा क्रांती मोर्चा आता कर्नाटकात धडकणार!

maratha

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे कर्नाटक राज्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात रविवारी (दि. १२) मराठा क्रांती मोर्चातर्फे बेळगाव जिल्ह्यातील कुडर येथे चिंतन बैठक घेण्यात आली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर चव्हाण यांनी दिली.

किशोर चव्हाण म्हणाले की, स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था स्थापन करणे, दिल्ली येथे होणाऱ्या मोर्चात कर्नाटक राज्याने सहभागी होणे, येथील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मारक कर्नाटक सरकारने बांधणे यांसह विषयावर चर्चा करण्यात आली.

वेरूळ येथील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंती कार्यक्रमात कर्नाटक येथील जनतेने सहभागी होणे तसेच बेंगळुरू येथे मोर्चा काढण्यावर चर्चा झाली. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विजय काकडे पाटील, ज्ञानेश्वर ढोबळे पाटील, दत्तात्रेय आनंदे, सहकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या