उदयनराजे भोसले कुठे होते ?

राजेंच्या अनुपस्थितीची सर्वत्र चर्चा

मुंबई:- रामोशी समाजाच्या आंदोलनात अचानक प्रकटणारे उदयनराजे भोसले यांनी मात्र आज झालेल्या मराठा मोर्चाला पाठ फिरवली. मुंबईतील मराठा क्रांती मुक मोर्चाचे उदयनराजे नेतृत्व करतील अशा बातम्या झळकत होत्या मात्र असे काहीही घडले नाही. त्यामुळे लाखो मराठे रस्त्यावर उतरले असताना उदयनराजे कुठे होते याचं उत्तर कोणाकडेच नाही

उदयनराजे मुंबईतील मोर्चास का आले नाहीत, याविषयी त्यांचे कोणीही समर्थक सांगण्यास तयार नाहीत. कोल्हापूरचे छत्रपतींसोबत उदयनराजेही आझाद मैदानावर उपस्थित राहतील अशी संपूर्ण मराठा समाजाला होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहिले पण उदयनराजे कुठेच दिसले नाहीत. नेतृत्वाच सोडा पण किमान मोर्चात उपस्थित राहिले असते तरी मराठा समाजाला आणखी आधार व बळ मिळाले असते. पण उदयनराजेंच्या या अनुपस्थिती बाबत सर्वांच्या मनात प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बहुतांशी आमदार मुंबईतील मोर्चात पहायला मिळाले. या सर्व गर्दीत उदयनराजेंची अनुपस्थिती जाणवणारी होती. यासंदर्भात त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. सूत्राकडून मिळालेल्या महिती नुसार उदयनराजे पुण्यातच होते. मात्र, ते मोर्चात का गेले नाहीत, हे मात्र, सांगण्यास नकार दिला.

You might also like
Comments
Loading...