मराठा क्रांती मोर्चा : आणखी तीन आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न

टीम महाराष्ट्र देशा – गंगापूर येथील जलसमाधी आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील आणखी दोन तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड तालुक्यात गुड्डू सोनावणे (33 वर्ष) या आंदोलकानं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गुड्डू गंभीर जखमी झाले आहेत. देवगांव रंगारी येथील ही घटना आहे. गु़ड्डू सोनावणे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जगन्नाथ सोनावणे नावाच्या आंदोलकानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

लातूरमध्ये आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान मंगळवारी (24 जुलै) सकाळी शिवाजी चौक येथे एका आंदोलकानं अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. दरम्यान, शहर व जिल्ह्यात सर्वत्र बंद आंदोलन शांततेत सुरू असताना शिवाजी चौकात घडलेल्या घटनेमुळे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या आंदोलकाला ताब्यात घेतल्यानंतर मराठा समाजाच्या अन्य कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडला.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या :

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

मराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक

इंदापुरात मे महिन्यात मराठा समाजाचे अधिवेशन

You might also like
Comments
Loading...