आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा नाशिकच्या आमदारांच्या घरी; आरक्षण मिळवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची नवी रणनिती

Maratha Kranti Morcha

नाशिक : मराठा क्रांती मोर्चानं आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी आता नवी रणनिती आखलीये. या रणनितीचा एक भाग म्हणून नाशिक जिल्हा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आमदारांच्या घरी जावून पक्षनेतृत्वाला आरक्षणाच्या बाजूनं उभे राहण्यासाठी राजी करण्यासाठी पञ देण्याचा आग्रह क्रांती मोर्चानं धरला.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार सिमा हिरे यांनी मराठा आरक्षणावर भाजपाच्या पक्ष नेतृत्वानं पाठींबा देऊन अनुकूलता दाखवावी असा आग्रह धरणारे पञ यावेळी समन्वयकांनी आ. हिरे यांना दिलंय, यावर क्रांती मोर्चाची भुमिका समन्वयकांनी स्पष्ट केलीये. सीमा हिरे नंतर क्रांती मोर्चा पुर्व नाशिकचे भाजपा आमदार राहूल ढिकले यांच्याकडे वळला. या ठिकाणीही मोर्चानं आपली भुमिका स्पष्ट केली.

यात आंदोलनात काॕ.राजू देसले, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, आशिष हिरे, शरद तुंगार, योगेश गांगुर्डे, माधवी पाटील, पुनम देशमुख यांच्यासह असंख्य मराठा समन्वयक सहभागी झाले होते.

पहा व्हिडिओ :

आरक्षण मिळवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची नवी रणनिती

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा नाशिकच्या आमदारांच्या घरी; आरक्षण मिळवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची नवी रणनिती#MarathaKrantiMorcha

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Wednesday, September 16, 2020

महत्वाच्या बातम्या :