ब्रेंकिंग: मराठा आरक्षण आंदोलन पेटले; सोलपुरमध्ये एसटी बस पेटवली

सोलापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये आज अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जात आहे. याच दरम्यान आंदोलकांनी बार्शी – सोलापूर महामार्गावर एसटी बस पेटवल्याची घटना घडली आहे. तर दोन – तीन बसेसची तोडफोड करण्यात आली आहे.

शांततामय मार्गाने काढण्यात आलेल्या ५८ मराठा मुक मोर्चानंतर देखील समाजाकडून करण्यात येणाऱ्या मागण्याकडे लक्ष दिल जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मुक मोर्चावेळी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही़. त्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याच दिसत आहे. त्यामुळे आता मूक मोर्चाला फाटा देत सध्या ठोक मोर्चाच आंदोलन केल जात आहे. याचाच भाग म्हणून आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.

बार्शी – सोलापूर महामार्गावर असणाऱ्या वडाळा गावानजीक सुरु असणाऱ्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यावेळी आक्रमक आंदोलकांनी एसटी बस पेटवल्या आहेत.