नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक; मराठा क्रांती मोर्चा तर्फे बुधवारी नवी मुंबईत आंदोलन

नवी मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात मिळालेल्या स्थगितीच्या विरोधात मराठा समाज आता आक्रमक झालाय. नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी बैठक घेत भूमिका जाहीर केली. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा तर्फे बुधवारी नवी मुंबईत आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

वाशीतील शिवाजी चौकात एकत्रित येत घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबतच सर्व पोलीस स्टेशन मध्ये मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देखील देण्यात येणार आहे. सोशल डिस्टनसिंगचे तसेच जमावबंदीच्या नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी समन्वयकांनी व्यक्त केली.

पहा व्हिडिओ :

मराठा क्रांती मोर्चा तर्फे बुधवारी नवी मुंबईत आंदोलन

नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक; मराठा क्रांती मोर्चा तर्फे बुधवारी नवी मुंबईत आंदोलन#MarathReservation #MarathKrantiMorcha

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Tuesday, September 15, 2020

महत्वाच्या बातम्या :