fbpx

हिना गावित यांच्या वाहनावर दगडफेक प्रकरण; भाजपकडून नंदुरबार बंद

नंदुरबार :  खासदार हिना गावित यांच्या गाडीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून नंदुरबार शहर, व नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान गावित यांना कार्यालयातचं रोखण्याचा प्रयत्न झाला. काही आंदोलकांनी गावित यांच्या गाडीवर चढून हल्ला केला. दरम्यान, गावितांना गाडीतून सुखरुप बाहेर काढण्यात आलं होत.

खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याबद्द्ल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे. डॉ. गावीत यांच्या गाडीची तोडफोड करण्यामागे आरक्षणाशिवाय कुठलाही हेतु नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान आपल्या गाडीची झालेली तोडफोड ही पुर्व नियोजीत असल्याची शक्यता खासदार डॉ. हीना गावीत यांनी व्यक्त केली आहे. आपल्या आधी आमदार कुणाल पाटील यांना जाऊ देण्यात आले. मात्र आपली गाडी फोडण्यात आली, असं सागत साक्षात मुत्यूच आपल्याला दिसल्याचे डॉ गावीत यांनी म्हंटल आहे. कोणालाही आरक्षण द्यायला आपण विरोध केला नसुन, अशी तोडफोड योग्य नसल्याचं त्या म्हणाल्या.

आज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत : उदयनराजे

आज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत : उदयनराजे