गनिमी कावा काय असतो हे सरकारला 9 ऑगस्टला कळेल

blank

पुणे : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे.मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाच्या वतीनं ठोक मोर्चा आंदोलन करण्यात आलं यामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, सरकारी मालमत्तेच मोठ्या प्रमानात नुकसान झालं. तसेच तीनजणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता.

दरम्यान ठोक मोर्चा आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले जाळपोळ, दगडफेक खुनाच्या प्रयत्नासारखे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी उद्या पुण्यात निषेध मोर्चाचं देखील आयोजन करण्यात येणार आहे.

आंदोलनात घुसून जाळपोळ करणारे समाजकंटक वेगळे होते, चंद्रकांत पाटलांनी ‘साप’वाली ऑडियो जाहीर करावी, सरकारने येत्या काळात योग्य ते पाऊल उचलली नाहीत, तर 2019 च्या निवडणुकांत प्रचारालाही फिरून देणार नाही मेगा भरतीला मराठा समाजाचा विरोध असल्याचं चित्र निर्माण केलं जात असल्याचंही म्हंटलं आहे. तसेच गुन्हे मागे न घेतल्यास येत्या 9 ऑगस्टला मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं जेलभरो अंदोलन करण्यात येणार असून, गनिमी कावा काय असतो हे सरकारला 9 ऑगस्टला कळेल असा इशाराही मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं देण्यात आला आहे.

ते रेकॉर्डिंग जाहीर करा, आगीत तेल ओतू नका ; पवारांनी चंद्रकांत पाटलांना झापले

मराठा आंदोलन पेटवणाऱ्या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती – चंद्रकांत पाटील