VIDEO- मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सराटेंना फासले काळे

मारहाण करत सुनावणीतून हाकलले, समन्वयकांनी बाळासाहेब सराटेंना फासले काळे.

औरंगाबाद- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या.एम.जी.गायकवाड हे सुभेदारी विश्रामगृह येथे समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांना  भेटून त्यांचे म्हणने एकूण घेत होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आयोगाला निवेदन देण्यासाठी जमले होते.

bagdure

सराटे हे मराठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त एजन्सीचे ते काम करीत असल्याचा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सुभेदारीवर गाठले आणि त्यांच्या तोंडाला काळे फासले. यावेळी सराटेविरोधात घोषणा दिल्या.

You might also like
Comments
Loading...