भगव्या वादळाची आझाद मैदानाकडे कूच

मुंबई : भायकळा येथून मराठा क्रांती मोर्चाला शांततेत सुरुवात, मोर्चाला प्रचंड गर्दी, मोर्चेकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. हातात भगवे झेंडे घेऊन लोक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत भायखळा येथून आझाद मैदानाकडे मोर्चाची सुरवात झाली आहे काही तासात हा मोर्चा आझाद मैदान येथे पोहचेल . दरम्यान , मोर्चा आझाद मैदान येथे पोहचण्यापूर्वीच आझाद मैदान गर्दीने भरले आहे तेव्हा आझाद मैदानात मोर्चेकऱ्यांना जागा पुरणार नाही . आज खऱ्या अर्थाने या मोर्चाला ऐतिहासिक मोर्चाच स्वरूप प्राप्त झाले आहे .