मोर्चा मध्ये राजकारण नकोच ; शिवसेनेचे फोस्टर फाडले तर बाळासाहेबांच्या पोस्टर चा मात्र सन्मान

मुंबई: भायखळ्यातील जिजामाता उद्यानाजवळ शिवसेनेने उभारलेलं मराठा क्रांती मोर्चाचं पोस्टर फाडण्यात आलं. मोर्चात राजकारण नको म्हणून केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पोस्टर ठेवत इतर पोस्टर फाडून टाकण्यात आली. राजकारण न करण्यावर मोर्चेकरी ठाम आहेत.

दरम्यान , मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना सुधा आंदोलकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे . या भगव्या वादाळाच रूप पाहता आशिष शेलार यांनी मोर्चातून पळ काढला . मुंबईत मराठा मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पोस्टर्सना विरोध करण्यात येत आहे.