सरकारने आंदोलकांच्या तोंडाला पान पुसली: अजित पवार

ajit pawar ncp

वेबटीम : मुंबईतील ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्च्यानंतर सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्यामुळे मोर्चा यशस्वी झाला असे बोलले जात असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र असमाधानी दिसत आहेत. सरकारने केवळ पोकळ आश्वासने दिली असून केवळ समाज एकवटल्याने त्याला शांत करण्यासाठी मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचा काम सरकारने केल असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचा काम
कोपर्डीतील पिडीतेवर झालेल्या अत्याचाराची केस फास्टट्रॅक कोर्टमध्ये चालवूनही आज सरकार आरोपीला फासी देवू शकलेले नाही. आता सरकार आरक्षणाबाबत मंत्र्यांची समिती नेमणार असल्याच सांगत मग एवढे दिवस काय झोपा काढल्या का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

आज पर्यंत ५७ वेळा ह्याच मागण्या करूनही एकही मागणी मान्य झालेली नाहीये . शेतकरी कर्जमाफी करत असताना जशा अटी घातल्या तसेच निकष याही ठिकाणी लावण्यात आले आहेत. सगळ्या जिल्ह्यात होस्टेल काढणार असल्याच सरकार सांगत आहे मग एवढ्या दिवसात ती का बांधली नाहीत. त्यामुळे केवळ समाज एकवटल्याने त्याला शांत करण्यासाठी मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचा काम सरकारने केल असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.