लाखोंच्या गर्दीतही मराठ्यांच माणुसकीच दर्शन…

मुंबई : शिस्त आणि आचारसंहितेचा आदर्श जगासमोर मांडणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई मधील महामोर्चामध्ये पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे . लाखोंच्या मोर्चात मुंबईची वाहतूक ठप्प झाली असताना रुग्णवाहिकेला मात्र या लाखोंच्या समुदायाने क्षणाचाही विलंब न करता वाट मोकळी करून दिली . त्यामुळे पुन्हा एकदा स्वराज्याच तोरण बांधणाऱ्या या समाजाने जगासमोर आपला आदर्श कायम ठेवला आहे.