‘मराठा क्रांती मोर्चा ही वादळापूर्वीची शांतता’, संभाजीराजेंचा इशारा

sambhaji maharaj

मुंबई : खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. ‘मराठा क्रांती मोर्चा ही वादळा पुर्वीची शांतता, समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा,’ असे संभाजीराजे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या 16 तारखेपासून कोल्हापुरातून सुरु होत असलेल्या मराठा आरक्षणाच्या या आंदोलनावरुन आता महाराष्ट्रातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बैठकांचं सत्र सुरु झाल्याचं दिसून येतंय. गुरुवारी या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी कोल्हापुरात संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली मराठा समन्वयक समितीची बैठक झाली.

दरम्यान, 16 जून रोजी कोल्हापूरमध्ये मोर्चा निघाल्यानंतर त्याच धर्तीवर सोलापुरात देखील दुसरा क्रांती मोर्चा काढण्याचे निश्‍चित झाले आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. 16 जून रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मोर्चा निघणार आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP