मराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा

महाराष्ट्र देशा: केरळ राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत लाखों संख्येत लोकांना आपले राहते घर सोडावे लागले आहे, तर 350 च्यावर लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नैसर्गिक संकटात सापडलेल्या केरळच्या मदतीला अनेक राज्य – देश धावून आले आहेत. त्यानंतर आता राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने केरळसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वेगवेगळ्या शहरांमधून पुरग्रस्तांना जीवनउपयोगी साहित्य पाठवण्यात येत आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा या मदतीची होत आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीवर गेल्या काही दिवसांत राज्यामध्ये अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याच पहायला मिळालं, त्यामुळे शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येत ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा युवकांनी हातात दगड घेतल्याचं बोलल गेल, परंतु आम्ही दगड नाही, तर जबाबदारी उचलतो, हा संदेश केरळला करण्यात आलेल्या मदतीतून देण्यात आला आहे.

पुरग्रस्तांना आवश्यक असणारी औषध, सोलापूर येथील मोर्चाकडून चादरी, तसेच नागरिकांच्या मदतीसाठी सहा डॉक्टर्स ४० च्यावर स्वयंसेवक केरळला रवाना झाले आहेत.