fbpx

‘बारायण’ मधील ‘त्या’ सीनला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा: शुक्रवारी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट बारायण आता वादात सापडला आहे. हिंदीतील ‘पदमावत’ या चित्रपटानंतर आता इतिहासाचा चुकीचा संदर्भ असल्याचा दावा करत, दीपक पाटील दिग्दर्शित ‘बारायण ‘ या मराठी सिनेमाला टार्गेट केलं जात आहे.

गणुजी शिर्के यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली असल्याचा आक्षेप काही लोकांनी नोंदवला असून तो आक्षेपार्ह भाग वगळावा आणि दिग्दर्शकाने माफी मागावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येथे गणोजी शिर्केंनी शंभुराजांना पकडून मुकरबखानाच्या ताब्यात दिल्याचा प्रसंग दाखविण्यात आला आहे. या चित्रपटातून परत एकदा खोटा इतिहास पसरवला जात आहे, हे गंभीर आणि निषेधार्ह आहे”, असं ट्विट मराठा क्रांती मोर्चाच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.

मात्र, विश्वास पाटील यांच्या ‘संभाजी ‘ या कादंबरीतील माहितीच्या आधारे तो सिन चित्रपटात घेतल्याची माहिती दिग्दर्शक दीपक पाटील यांनी दिली.

दरम्यान, ‘बारायण’ या चित्रपटातले त्या सीनचे विडीयो सध्या सोशल मिडीयावर खूप वायरल होत आहे. ह्या व्हिडीओला अवघ्या दोन दिवसात सुमारे २५ हजार लाईक तर पंधरा हजारांपर्यंत शेअर्स मिळाले आहेत. आता पर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा विडीयो पाहिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यागाथेवर आणि त्यांच्यावर झालेल्या दगा फटक्या विषयी ह्या विडीयो क्लीप मध्ये दाखविले गेले आहे. असं काय आहे त्या क्लीप मध्ये? इतकी झुंबड सोशल मिडिया कडे का धाव घेत आहे? हे सिनेमा बघितल्यावरच कळेल.