मराठा क्रांती मोर्चाला ‘हाच’ नेता करु शकतो शांत…!

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : सध्या महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ घोंगावत आहे. संबंध महाराष्ट्रात याचे लोण झपाट्याने वाढत आहे. तब्बल ५८ मूक मोर्च्यांनंतर सुरु झालेले हे ठोक मोर्चे आता हिंसक होत आहेत. हे हिंसेचे लोण सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्ये, मोर्चेकऱ्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे यामुळे अधिकचे चिघळत असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय जाणकारांच्या अंदाजानुसार ४ ते ६ % च समाज रस्त्यावर उतरला असून सुद्धा सगळीकडे हाहाःकार माजला आहे. जर ही तीव्रता अशीच वाढत गेली आणि समाज मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊ लागला तर सरकारला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे वेळीच या प्रश्नावर तोडगा काढावा लागेल.
पेटलेला मराठा तरुण हिंसक होत आहे. अगदी कुमारवयीन मुले यात हिसंक होत असल्याने याची गंभीरता अधिकची आहे.

सध्या मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, नारायण राणे असे सगळेच राजकीय नेते आंदोलकांना शांततेची विनवणी करत आहेत ,परंतु त्याला समाजाकडून मिळणारा प्रतिसाद जवळपास शून्यच आहे. समाज उलट त्यांच्यावरच हल्ला चढवत आहे. या सर्व संतप्त समाजाला एकच व्यक्ती थोपवू शकतो, असे दबक्या आवाजात बोलले जात आहे. ते म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.
समाजात विशेष करून तरुणांमध्ये त्यांच्या बाबत असणारा आदरयुक्त दरारा सर्वश्रुत आहे. सध्याच्या हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीला उदयनराजेच रोखू शकतात. त्यांच्यावर असणारा समाजाचा विश्वास पाहता, त्यांच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे..!

गिरीश महाजनांंनची प्रतिष्ठा पणाला ; जळगाव महापालिकेच्या मतदानाला सुरुवात

ऐतिहासिक भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात