मराठा आरक्षणासाठी बार्शी रोडवर चक्काजाम आदोंलन

माढा तालुका प्रतिनीधी : माढा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मराठा आरक्षणासाठी गाव तेथे चक्काजाम आंदोलन आयोजित केले होते. कुर्डूवाडी, माढा, मोडनिंब, टेभुर्णी आदी शहराला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यावर प्रत्येक गावागावात मराठा ठोक मोर्चाने चक्काजाम आंदोलन केले. कुर्डूवाडी बार्शी रोडवर म्हैसगाव , चिंचगाव ,भोसरे येथे एक तासभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी हाजारो मराठे रस्त्यावर ऊतरुन सरकारविरोधी घोषणा देत होते.

माढा तालुक्यात सत्ताधारी मंत्री खासदार, आमदार आल्यास त्यांना तालुक्यात पाय ठेवु देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समनवयक हर्षल बागल यांनी चक्काजाम आंदोलनात बोलताना दिला माढा तालुक्यातील भोसरे, म्हैसगाव, चिंचगाव, लऊळ, बारलोणी, अंबाड येथे करण्यात आलेलं चक्काजाम आदोंलन शांततेत पार पडलं. यावेळी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या चक्काजाम आंदोलनाला समनवयक हर्षल बागल , राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते वामनभाऊ ऊबाळे , स्वाभिमानीचे नेचे शिवाजी पाटिल, जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब ऊबाळे , भोसरे पचांयत समिती गणाचे सदस्य सुरेष बागल ,तडवळेचे सरपंच धनंजय परबत , म्हैसगावचे सरपंच पंडित खारे , सहभागी झाले होते.

अशी आहे मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता

मराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली