मराठ्यांचे रौद्र रुप – कुर्डूवाडी पंढरपुर रोडवर एस.टी तोडफोड सत्र सुरुच

कुर्डूवाडी प्रतिनीधी / हर्षल बागल : सकल मराठा समाजाने राज्यात पुकारलेल्या आंदोलनाला आत्ता हिसंक नव्हे तर रौद्ररुप धारण केले आहे. पंढरपुरला आषाढी एकादशीच्या महापुजेला आरक्षण जाहिर केल्या शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना येऊ द्यायचे नाही असा ठाम निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. कुर्डूवाडी पंढरपुर रोडवर लऊळ , बावी या गावांजवळ काल रात्री पासुन चार एस. टी बसच्या काचा आंदोलकांनी फोडल्या आहेत.

मुख्यमंत्र्याचा दौरा लक्षात घेता सोलापुर जिल्हा पोलिस प्रशासनासमोर हि मोठी कसोटी ठरत आहे . कायदेशीर मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करा असे आंदोलकांना पोलिसाांकडुन आवाहन करण्यात येत आहे. पण मराठा आंदोलनाच्या भावना अधिक तीव्र झाल्याने राज्यात जागोजागी तोडफोड सत्र चालुच आहे.

मराठा आरक्षण , धनगर आरक्षण , महादेव कोळी आरक्षण यांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिल्याने पंढरपुरात मोठा पोलिस बंदोबस्त वाढवला आहे तर अनेक कार्यकर्त्यांचे धरपकड सत्र पोलिसांनी सुरु केले आहे. या धरपकड सत्रामुळे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

आंदोलक व वारकरी ओळखण्यात पोलिसांना अडचण

मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी हातात भगवे झेंडे घेतले आहेत तर वारकऱ्यांच्या हातातही भगवे झेंडे घेतले असल्याने नक्की आंदोलक कोण व वारकरी कोण असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

करमाळा कुर्डूवाडी बार्शी सोलापुर शहर , वडाळा , मोडनिंब , टेभुर्णी , पंढरपुर , सांगोला , मंगळवेढा , आदी ठिकाणी आंदोलन वाढत जात असल्याचे चित्र निर्माण झाले असुन एका बाजुला मुख्यमंत्र्याचा बंदोबस्त तर दुसऱ्या बाजुला आंदोलकांना हाताळणे व वारकरी बाधंवाची सुरक्षा अशा धर्मसंकटात पोलिस यंत्रणा आडकली आहे. पंढरपुरात तब्बल अंदाजे सहा हजारांच्या पुढे पोलिस बंदोबस्त असल्याची सुत्रांची माहिती आहे.