मराठा आरक्षणावर हायकोर्टात आज होणार सुनावणी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात उमटलेल्या हिंसक आंदोलनांची दखल घेत मुंबई हायकोर्टात आज मराठा आरक्षणा संदर्भात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यभरातील आंदोलनांची बाब कोर्टाच्या नजरेस आणून दिली आहे, तसेच आत्तापर्यंत सात तरूणांनी आत्महत्या केल्याचीही माहीती पाटील यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली होती. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती.

यानंतर कोर्टाने आज या प्रकरणाची सुनावणी घ्यायचा निर्णय घेतला आहे. हायकोर्टानं राज्य सरकारला ३१ जुलैपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात डिसेंबर २०१७ मध्ये दाखल करण्यात आली होती.दरम्यान आज न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला

लोकसभा निवडणुकीनंतर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल-चंद्रशेखर राव