fbpx

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयाकांचा रुद्रावतार, योजना कार्यालयात तुफान राडा

टीम महाराष्ट्र देशा : आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या फाईल मंजूर होत नसल्याने औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रमक झालेल्या समन्वयाकांचा आज रुद्रावतार पहायला मिळाला. वारंवार हेलपाटे मारून देखील कामे होत नसल्याने सेवा योजना कार्यालयात समन्वयकांनी अधिकाऱ्यांवर फाईल भिरकावत चांगलंच धारेवर धरलं.

आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या फाईल मंजूर होत नसल्याने हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ‘या सरकारने फक्त फसवणूक केली. मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीबाबत फक्त गाजर दाखवले आहे,’ असं म्हणत हे समन्वयक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.