यापुढे मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करणार नाही; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

पुणे :  आम्ही सर्वांना पोटतिडकीने शांततेचं आवाहन करत होतो, मात्र दुपारनंतर तोडफोड झाली. तोडफोड करणारे कोण हे पोलीस तपासात समोर येईल, झाल्या प्रकाराबद्दल पुणे मराठा मोर्चा माफी मागतो असं मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबाद आणि पुण्याच्या हिंसेनंतर आता यापुढे मराठा समाज रस्त्यावरचं आंदोलन करणार नाही असं देखील समन्वयकांनी स्पष्ट केलं आहे.

गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांचं आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केले होतं. या पार्श्वभूमीवर आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीन पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

  पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

यापुढे मराठा समाज रस्त्यावरचं आंदोलन करणार नाही, औरंगाबाद आणि पुण्याच्या हिंसेनंतर मराठा मोर्चाची घोषणा

हिंसा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, पण शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करु नये
यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही, शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण होईल – पुण्यात मराठा मोर्चाची पत्रकार परिषद
ज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका

तोडफोड करणारे मराठा मोर्चाचे नाहीत, त्यांचा आमच्याशी संबंध नाही

मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, मराठा मोर्चा समन्वयकांचं आवाहन
15 ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलन : मराठा मोर्चा

15 ऑगस्टला एक वेळ चूल बंद आंदोल करणार