पगार थकल्याने परप्रांतीय कामगारांनी औरंगाबादमधील कंपन्या फोडल्या – मराठा क्रांती मोर्चा

पुणे :  कामगार कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यवसायिकांच्या वागणुकीमुळे, तसेच पगार थकल्याने परप्रांतीय कामगारांनी औरंगाबाद येथील वाळुंज एमआयडीसीमधील कंपन्या फोडल्याचा दावा, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून करण्यात आला आहे.

काल महाराष्ट्र बंद दरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत, यामध्ये वाळुंज एमआयडीसीतील जवळपास 40 च्यावर बंद असणाऱ्या कंपन्यांची तोडफोड करण्यात आली होती. तोडफोडीच्या घटनेनंतर उद्योजक देखील आक्रमक झाले आहेत. अशा घटना घडणार असतील तर व्यवसाय कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्याकडून केला जात आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनामध्ये अनेक बाहेरच्या शक्ती घुसल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून केला जात आहे. या बाहेरील प्रवृत्तीकडून तोडफोड करणे आणि दगडफेकीच्या घटना घडत असल्याचं यावेळी समन्वयकांनी सांगितले आहे.

औरंगाबाद – किती दिवस कंपन्या ‘बंद’ ठेवाव्यात; उद्योजकांचा आक्रमक प्रश्न

महाराष्ट्र बंद : नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन

You might also like
Comments
Loading...