fbpx

‘मराठा’ ही कोणी वेगळी जात नसून हा समाज ‘कुणबी’ जातीतच मोडतो’

मुंबई – ‘मराठा’ ही कोणी वेगळी जात नसून हा समाज ‘कुणबी’ जातीतच मोडतो’, असं मागास प्रवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

कुणबी समाजाला ओबीसी वर्गात आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजालाही आरक्षण मिळावं ही त्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी रास्त आहे, असं निरीक्षण नोंदवत राज्य मागास प्रवर्ग आयोगाने मराठा समाजाला 16 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात केली होती.

उपलब्ध पुराव्यांनुसार मराठा ही वेगळी जात नसून तो मराठी भाषा बोलणाऱ्यांचा समुदाय आहे. त्यांची जात कुणबी असून शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. संपूर्ण संशोधनाअंती मराठा समाज हासुद्धा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्या मागास असल्याचं आयोगाने आपल्या अहवालात म्हटलं आहे. याबाबत एबिपी’माझा’ने वृत्त दिले आहे.