fbpx

‘मागण्यांसाठी मराठा समाज यापुढे मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जाणार नाही’

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीड वर्षांपूर्वी यांनी मराठा समाजाला आश्वासनं दिली होती. परंतु त्यातील एकाही आश्वासनाची पुर्तता फडणवीस यांनी केलेली नाही. आता यापुढे मराठा समाज कोणत्याही मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जाणार नसल्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे.

यापुढे मराठा समाजाची भूमिका म्हणजे, कमळाला नाकारा अशीच असणारा आहे, असे स्पष्ट मत मराठा समाजाने व्यक्त केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पोखरकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

मराठा समाजाने त्यांचे उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उभं करण्याचाही निर्धार मराठा समाजाने केला आहे. सरकारला विनंती करुन काही उपयोग नाही त्यांच्यावर दबाव आणूनच आपल्या मागण्या पूर्ण होतील, अशी भूमिका पोखरकर यांनी स्पष्ट केली आहे. कोपर्डीच्या पीडितेला न्याय, आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या मागण्यांसाठी मराठा समजाने 58 मोर्चे काढले होते.