छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही – हर्षवर्धन जाधव

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभानिवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मत मराठा आरक्षणाच्यामागणीसाठी राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मांडले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठल्याही राजकीय पक्षाला रस नाही. आपल्याला फक्त फिरविले जात आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर बसण्याची गरज आहे, तशी भूमिका कुठलाही पक्ष घेण्यास तयार नाही. माणसे मरत असताना माझा पक्ष मला म्हणतो, आरक्षणाबाबत बोलायचे नाही. याला तोडगा एकच आहे, आपले छत्रपती शासन आणणे. मराठा बांधवांनी यावर विचार करावा. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करणे गरज असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. आपली माणसे निवडून आणावी लागतील. अस हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलावली भाजप आमदारांची तातडीची बैठक

अजितदादांमुळेच आम्ही सत्तेत – गिरीश महाजन