मराठा समाज करणार ‘थोबाड फोडो आंदोलन’! कोणत्या नेत्यापासून होणार सुरुवात?

Maratha arakshan

कोल्हापूर : राज्यात आरक्षणाचा वाद पुन्हा चिघळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर, दुसरीकडं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यात यावा यासाठी धनगर समाजाने देखील राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं होत असतानाच आज कोल्हापुरात राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या गोलमेज परिषदेला अनेक मराठा संघटनांच्या नेत्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आहे. या परिषदेत मराठा समाजाच्या वतीने १५ ठराव मांडण्यात आले आहेत.

मराठा समाजाचे ‘थोबाड फोडो’ आंदोलन!

मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं केली जात आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज (बुधवारी) राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली. मराठा आरक्षणासाठी यापुढे ‘थोबाड फोडो आंदोलन’ करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही, असा इशारा मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी दिला आहे.

विजयसिंह महाडिक यांनी सांगितलं की, मराठा समाज आता गनिमी काव्यानं आंदोलन करणार आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ‘थोबाड फोडो आंदोलन’ करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही. आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरतीची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशीही केली मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-