fbpx

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे, मुख्यमंत्री राज्यपालांचे मानले आभार

टीम महाराष्ट्र देशा : चालू शैक्षणिक वर्षापासून मराठा समाजातील मुलांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आणलेल्या वटहुकूमावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी काल केली . राज्य सरकारने आणलेल्या वटहुकूमामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजातील मुला-मुलींसाठी राखीव जागा असतील. पदवी शिक्षणासाठीही हे आरक्षण लागू होणार आहे.

दरम्यान,वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश मिळावा, यासाठी सुरू असलेले आंदोलन मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी मागे घेतले आहे. राज्यपालांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यादेशावर सही झाल्यानंतर सोमवारी राज्य शासनाने CET च्या अधिकृत वेबसाईटवर तशी नोटीस काढली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचे आभार मानत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. सरकारने अॅडमिशन  पुर्ववत केल्याची नोटीस दिल्याने आंदोलन मागे घेत, असल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली.