मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाही- बच्चू कडू

bacchu kadu and devendra fadnvis

आैरंगाबाद –  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास राहिला नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय.

सरकारमध्ये अस्पष्टता नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलेले आहे. आंदोलकांनी आता मुंबई बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आंदोलन जास्त चिघळण्याची शक्यता आहे.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती  करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.