मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही, याची सरकारला खात्री : जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा– राजकीय पोळी भाजून घेणे, हाच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे. भारंभार आश्वासने देणाऱ्या या सरकारने मराठा आरक्षणाच्या विषयावरही फसवणूकच केली आहे. कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी हे सरकार करते. आपण दिलेले मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही, याची फडणवीस सरकारला कल्पना आहे. या मुद्द्याचा वापरही त्यांनी केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी केलाय,  अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

bagdure

दरम्यान आता मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत . मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणालाच मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण अभ्यास न करता दिल्याने ते रद्द करण्याची मागणी याचिकेतून बाळासाहेब सराटेंनी केली आहे.

You might also like
Comments
Loading...