मराठा आणि ओबीसी समाजच आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार करणार- केनेकर

Sanjay Kenekar

औरंगाबाद : मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभुल करुन आघाडी सरकार सत्तेत बसले आहेत. त्यांना आता हाच समाज सत्तेतून पायउतार करेल. आघाडी सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली असल्याचा आरोप भाजप शहर अध्यक्ष संजय केनेकर यांनी केला आहे. औरंगाबादेत क्रांती चौकात आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.

आघाडी सरकारमीधल मंत्री असलेले छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवर हे दोघे स्वत:ला ओबीसी समाजाचे नेतृत्त्व असल्याचे सांगत होते. मात्र, त्यांनी या समाजाचा केवळ राजकीय वापर करुन घेतला आहे. त्यामुळे आता ओबीसी समाज नाराज आहे. या समाजाचे प्रतिनिधीत्त्व भारतीय जनता पक्ष करत असल्याचेही ते म्हणाले. भाजपचे आजचे आंदोलन ही नुसती सुरूवात आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही तर या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारच्या वतीने तसे आश्वासन देखील देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या