मराठा आंदोलनांची राज्य सरकारला पुन्हा १० दिवसांची मुदत, नसता आंदोलनाचा इशारा

मराठा आंदोलनांची राज्य सरकारला पुन्हा १० दिवसांची मुदत, नसता आंदोलनाचा इशारा

Maratha

जालना :  मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या मागणीला १० दिवसात न्यायच पाहिजे, नसता सरकारला मोठी किंमत मोजावी लागणार असा इशारा साष्टपिंपळगाव इथल्या मराठा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात १० दिवसात निर्णय नाही घेतला तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार असल्याचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

मनोज जरांगे पाटिल यांनी २९ सप्टेंबरला शहागड येथिल गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारून जलसमाधी आंदोलन केले होते. त्यावेळेस सरकारने १० दिवसाचा वेळ मागीतला होता, परंतू एक महिना उलटून गेला आहे तरी पण सरकारने अजूनही कोणतीही कारवाई केली नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटिल यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी यांची भेट घेत प्रत्यक्ष चर्चा केली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले.  त्या निवेदनानुसार, जर सरकारने १० दिवसात मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  या आंदोलनाचे उग्ररूप सरकारला परवडणारे नसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या