fbpx

करणी सेनेच्या गुंडांनाही जीपला बांधून फिरवा – उमर अब्दुल्ला

OmarAbdullah

टीम महाराष्ट्र देशा: पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी करणी सेनेकडून देशभरात आंदोलन करण्यात आल. यामध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत अनेक गाड्यांची तोडफोड केली. याच तोडफोडी दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून यामध्ये शाळेच्या बसवर दगड फेक करण्यात आल्याच दिसत आहे. ज्यावेळी या स्कुल बसवर दगडफेक करण्यात आली त्यावेळी आतमध्ये असणारे चिमुकले अक्षरश जीव मुठीत घेवून बसल्याच दिसत आहे. या घटनेचा देशभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे.

याच घटनेचा निषेध करत नोंदवत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत निशाना साधाला. ‘करणी सेनेच्या गुंडांनाही जीपला बांधून स्कूलबस आणि चित्रपट गृहांच्यासमोर परेड केली जावी’ अस ट्विट अब्दुल्ला यांनी केल आहे.

मागील वर्षी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना थांबवण्यासाठी मेजर नितीन गोगाई यांनी दगडफेक करणाऱ्या तरुणाला जीपच्या बोनेटला बांधून परेड काढली होती. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये याचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला होता. दरम्यान दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी हे कराव लागल्याच मेजर गोगाई यांनी सांगितल होत. याच गोष्टीचा धागा पकडत उमर अब्दुला यांनी हे ट्वीट केल आहे.

1 Comment

Click here to post a comment