माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल- हंसराज अहिर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी माओवाद्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही, त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. असे स्पष्ट केले. हंसराज अहिर एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका निनावी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. मागच्या महिन्यात गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती तसेच आता पुण्यातून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक निनावी पत्र आले आहे.

माओवाद्यांकडून राजीव गांधी हत्याकांडासारखं घातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता, असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं. त्यामुळे माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीचं असल्याचा संशय व्यक्त होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र पाठवण्यात आल आहे. या पत्रात आमचा मार्क्सवादाचा विचार तुम्ही संपवू शकणार नाही असे म्हटले आहे. दरम्यान हे पत्र मिळाल्यानंतर गृहविभागाने मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा अधिक कडक केली आहे.