fbpx

माओवाद्यांनी दिला 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा- नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. आज माओवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला करण्यात आला होता. यानंतर विविध प्रकारे त्याठिकाणच्या जनजीवनाला विस्कळीत करण्याचे माओवाद्यांचे प्रयत्न सुरूच आहेत.

आता माओवाद्यांनी गडचिरोली बंद करण्याचे आवाहन केले असून दुर्गम भागात काही ठिकाणी लाल रंगाचे बॅनर मोठय़ा प्रमाणात लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी येत्या 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचा इशारा दिला आहे.

एट्टापली तालुक्यातील गुरूपल्ली मार्गावर तसेच आलापल्ली मार्गावर तसेच भामरागड मार्गावर माओवाद्यांनी बॅनर लावले आहेत. धक्कादायक म्हणजे, गडचिरोली सी-सिक्स्टी पोलीस कमांडो पथकाचाही बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.