माओवादी समर्थकांना अटक; महाराष्ट्र पोलिसांना मानवाधिकार आयोगाची नोटीस

टीम महाराष्ट्र देशा – एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि आर्थिक मदत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी माओवाद्यांच्या थिंक टँकवरच हल्ला केला. पोलिसांनी धडक कारवाई करत काल पाच जणांना ताब्यात घेतले होते मात्र आता माओवादी ‘थिंक टँक’ अटक प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावली आहे.

तेलगू कवी वरवरा राव, अरुर परेरा, गौतम नवलखा, वर्णन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांची नावे समोर आल्याने ही कारवाई केली. पोलिसांनी जप्त केलेल्या एका पत्रामध्ये तर नवलखाचा कश्मीरमधील फुटीरवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी या अटकसत्रादरम्यान निर्धारित कार्यपद्धतीचं, नियमांचे योग्य पालन केले नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणलं आहे. अहवालानुसार ही बाब म्हणजे त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचंही म्हटलं आहे.

दरम्यान,बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. रोमिला थापर, प्रभात पटनाई, सतीश देशपांडे आणि अन्य मंडळींनी ही याचिका दाखल केली