अजुनी यौवनात मी… असं अनेकांना वाटतं; राऊतांचा फडणवीसांना टोला

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलाताना राऊतांंनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिदाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन खोचक टोला लगावला आहे.

अजुनी यौवनात मी, असं अनेकांना वाटतं. हे नाटक रंगमंचावर फार गाजलं. तसं अनेकांना वाटतं की अजुनी यौवनात मी. मी अजूनही मुख्यमंत्री… आम्हालाही दिल्लीत गेल्यावर कधी कधी वाटतं आमचा पंतप्रधान होणार, असा टोला संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मन की बात’ केली. मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे सातत्यानं पुण्यात येत होते. आम्ही पुण्यात संघटनेचं काम करतो. तरी आमचा पुण्यात महापौर बसू शकला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची, पुणेकरांची इच्छा आहे. आमचं स्वप्न आहे की पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांवर शिवसेनेचा महापौर असावा, असंही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या