प्रमुख पक्षातील अनेक नाराज आमदार, नेते शिवसेनेच्या संपर्कात : राऊत

sanjay-raut1

टीम महाराष्ट्र देशा- प्रमुख पक्षातील अनेक आमदार, प्रमुख पक्षातील महत्वाचे नेते शिवसेनेच्या संपर्कात असून सर्वजण योग्य वेळेची वाट पाहत असून हळूहळू तुम्हाला दिसेल अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान राऊत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

प्रमुख पक्षातील अनेक आमदार, प्रमुख पक्षातील महत्वाचे नेते शिवसेनेच्या संपर्कात असून सर्वजण योग्य वेळेची वाट पाहत असून हळूहळू तुम्हाला दिसेल .यात अनेक नामवंत नावंही आहेत. आशिष देशमुखांसारखे प्रमुख पक्षातील अनेक नाराज आमदार, नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत.