उर्मिलाची संपत्ती आणि शिक्षण ऐकून अनेकांना वाटतंय आश्चर्य

टीम महाराष्ट्र देशा- प्रसिद्ध अभिनेत्री आणि उत्तर मुंबईतील उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसच्या तिकीटावर आपलं नशीब आजमावणार आहे. ४८ वर्षीय उर्मिलाने काल (सोमवारी) वांद्र्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रतिज्ञापत्रात उर्मिलाने आपली संपत्ती, शिक्षण, गुन्हेविषयक माहिती जाहीर केली आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे शिक्षण एप्रिल, १९९०मध्ये डी. जी. रुपारेल कॉलेजमध्ये एस. वाय. बीएपर्यंत झाले आहे. सन २०१७-२०१८ आर्थिक वर्षात एकूण करपात्र उत्पन्न २ कोटी ८५ लाख ७० हजार ४४८ रुपये आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात करंजा येथे ४.१७ एकर जमीन आणि आलेवाडी येथे ५.०९ एकर जमीन असून, त्या दोन्ही जमिनीची किंमत १ कोटी ६८ लाख १९ हजार रु. आहे.

तिच्या नावावर ३२ लाख ६५ हजार ३०० रुपयांचे कर्ज आहे. मर्सिडीज कार आणि अक्टिव्ह मॅग्ना अशा दोन मोटारी तिच्याकडे असून त्यांची किंमत अनुक्रमे ६६ लाख ७४ हजार आणि ७ लाख २४ हजार रुपये आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांचे शेअर्स आहेत. उर्मिला मातोंडकर यांच्यावर कोणताही गुन्हा नाही तसेच उर्मिला करोडपती असताना तिचा पती अख्तर मिरच्या नावे मात्र ८३ लाख रुपयांचीच संपत्ती आहे.