वीर सावरकरांबद्दल अनेक गैरसमज ते मुस्लिमांचे शत्रू नव्हते- मोहन भागवत

mohan bhagvat

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर कठोरपणे बोलले म्हणून जनतेचा गैरसमज झाला. पण जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर देशाला फाळणीला सामोरे जावे लागले नसते.असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे. ते ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलत होते.

वीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते त्यांनी तर उर्दूमध्ये गझल लिहिली होती. स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील. त्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत. त्यांच्याबद्दल योग्य माहितीही लोकांना उपलब्ध करून दिली जाईल. असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती. असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह यांचीही यावेळी उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या