राज्यातील अनेक मंहत आज साष्टपिपंळगावात; आंदोलनाचा ४६ वा दिवस

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला रविवारी राज्यातील अनेक मंहत व मठाधीपती पाठिंबा द्यायला आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत. मागील ४६ दिवसांपासुन साष्टपिपंळगाव येथील ग्रामस्थ मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ठिय्या आंदोलन करत आहेत. विशेषकरून या ठिय्या आंदोलनात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात साष्टपिपंळगाव येथे सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला राज्यभरातून विविध संघटनाकडून पाठिंबा मिळाला आहे. या आंदोलनाची धार दिवसेंदिवस अधिकच तिव्र होत चालली आहे. याच पार्श्वभूमिवर ७ मार्च रोजी आरक्षण मिळावे यासाठी आक्रोश मेळावा होणार आहे. साष्टपिपंळगावच्या या मराठा समाजाच्याा आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यभरातून विविध ठिकाणचे शेकडो महंत आंदोलनस्थळी दाखल होत आहेत.

दरम्यान, साष्टपिपंळगावात आक्रोश मेळाव्याला नारायणगडाचे महंत, मठाधिपती शिवाजी महाराज, बंकटस्वामी मठाचे महंत, मठाधिपती, अध्यक्ष वारकरी संस्थेचे अध्यक्ष यासह अनेक ठिकाणांहून मराठा समन्वयक येत आहेत. मराठा समाजातील यावेळी संयोजक मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी, ‘जीव गेला तरी चालेल, परंतु जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळत नाही, समाजाची हालअपेष्टा थांबत नाही, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार’ असा आक्रमक पावित्रा घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या