पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या तसेच मुंबईहून सुटणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द

mumbai floods

मुंबई : मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आज मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानक व लोकमान्य टिळक स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.

११०१२ नांदेड – एलटीटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. एलटीटी स्थानकावरून सुटणाऱ्या १२१६७ वाराणसी एक्स्प्रेस , कोईमतूर एक्स्प्रेस , हुबळी एक्स्प्रेस , नांदेड रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरून सुटणाऱ्या चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस, करमाळी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेल्या तसेच मार्ग बदलण्यात आलेल्या काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे