fbpx

भीमजयंती : पालकमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी केले ‘महामानवाला’ अभिवादन

टीम महाराष्ट्र देशा : आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती साजरी होत आहे. भाजपचे पुणे लोकसभेसाठीचे उमेदवार गिरीश बापट यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला तसेच पुणे कॅम्प मधील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

यानिमित्ताने गिरीश बापट यांच्यासह सहकाऱ्यांनी सम्यक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या लाडू वाटप उपक्रमाला, तसेच वसीम भाई पैलवान यांच्या वतीने आयोजित सरबत उपक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच नंदनवन तरुण मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे बक्षीस वितरण केले. पुढे गिरीश बापट यांनी दांडेकर पुलाजवळील विवेकानंद तरुण मंडळ तसेच अजिंक्य तरुण मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिकृतीला अभिवादन केले तसेच लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची प्रतिकृती याचेदेखील उदघाटन केले.आजच्या या कार्यक्रमाला अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, पुण्यात युतीकडून भाजपचे उमेदवार गिरीश बापट हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे तर त्यांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे.