‘कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी देशात अनेकांचा मृत्यू’ ; गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

gadakari

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनची मागणी 3,095 मेट्रिक टन एवढी होती. तर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी 9,000 मेट्रिक टन पर्यंत पोहोचली. त्यामुळे केंद्राला राज्यांमध्ये समान वितरणाची सोय करावी लागली असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत सांगितलं. त्यावरुन विरोधी पक्षांसह नेटीझन्सनेही सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, या उत्तरानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, देशात ऑक्सीजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये गडकरी स्पष्टपणे म्हणतात कि, कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचा जीव गेला आहे.’ दरम्यान गडकरी यांना भाजपच्या पहिल्या फळीतील मंत्री मानले जाते. त्यामुळे त्यांचेच हे वक्तव्य आता भाजपची चांगलीच कोंडी करेल असे चित्र दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP