‘मंत्र्यांची अनेक प्रकरणं बाहेर येताहेत त्यामुळेच बंद पुकारला’; राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात

राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर : कालच्या महाराष्ट्र बंद प्रकरणी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. महाविकास आघाडीचं अपयश आता समोर येत असून मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येताहेत. त्याचमुळे कालचा महाराष्ट्र बंद पुकारला गेला, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

लखीमपूरच्या घटनेचे समर्थन कोणीही करु शकत नाही. राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सरकार मदत करायला तयार नाही. महाविकास आघाडीचं अपयश समोर येत असून मंत्र्यांच्या अधिका-यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येतायत. त्याचमुळे कालचा महाराष्ट्र बंद पुकारला गेला. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे. या सरकारने विश्वास गमावला आहे. आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असेही विखे पाटील म्हणाले.

सरकारची एवढी बदनामी झालीय की सरकारने सामान्य जनतेचा विश्वास गमावलाय. भ्रष्टाचाराची मालिका आणि सरकारचं अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्र बंद करून आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे. राज्य सरकारने कितीही नौटंकी केली तरी जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टिका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री फरार असल्याची ही पहिली घटना आहे. आयकरच्या धाडीत हजारो कोटींचा भ्रष्टाचार समोर आलाय. असे अनेकही मंत्री अडकलेले असून कोणाला लक्ष्मी प्रसन्न झाली? कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले? हे समोर येणारच आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या