करमाळ्यात माणुसकी च्या भिंतीला उदंड प्रतिसाद

सोलापूर : सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा तालुक्यात  कै . बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष  सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांच्या संकल्पनेतुन व  नगरसेवक डॉ अविनाश घोलप यांच्या मार्गदर्शना खाली करमाळा शहरात गेल्या आठ महिन्या पासून “माणुसकी ची भिंत ” या नावाची एक आगळी वेगळी भिंत चालु आहे
                    “हवे असेल ते नह्या व नको असेल ते द्या ” या हकेला शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला असून अनेकांनी आपल्या घरातील नको असलेले साहित्य उदा कपडे, बुट , चपला या भिंतीवर आणुन अडकवायला सुरू केले तर समाजातील अनेक गोरगरीब लोक आपल्याला हवे असलेले कपडे , स्वेटर , ब्लँकेट घेऊन जात आहेत .
      सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांच्या संकल्पनेतुन सुरू करण्यात आलेल्या या भिंती मुळे माणुसकीची चांगलीच देवाण घेवाण होत आहे .
           नुकतीच या माणुसकी च्या भिंतीला करमाळा शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी अशोककुमार दोशी यांनी भेट देऊन नवीन आपल्या दुकानातील नवीन ड्रेस  , टि शर्ट  , शाळेचे गणवेश , भेट दिले आहेतLoading…


Loading…

Loading...