भेंडीचे भरघोस उत्पन्न काढण्यासाठी असे करा खते व पाण्याचे व्यवस्थापन

टीम महाराष्ट्र देशा : पेरणीच्या वेळी 50-50-50 किलो हेक्टर नत्र स्फूरद व पालाश यांची मात्रा जमिनीत मिसळावी व पेरणीनंतर एक महिन्याचे कालावधीने नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो या प्रमाणात दयावा. पेरणीनंतर हलके पाणी दयावे. त्यानंतर 5 ते 7 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळया दयाव्यात.

एक कोळपणी व दोन निंदण्या करुन शेतातील तणांचा बदोबस्त करावा. भेंडीवर प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 1 किलो किंवा डायथेनएम 45, 1250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.

Loading...

भेंडी पिकास मावा तुडतुडे शेंडेअळी लाल कोळी या किडींचा प्रादूर्भाव होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी 35 सीसी एन्डोसल्फान 1248 मिली किंवा सायफरमेथीरीन 35 सी सी 200 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. पहिली फवारणी उगवणीनंतर 15 दिवसांनी नंतरच्या फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने करावी.

पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी फळे तोडणीस तयार होतात. दर 3 ते 4 दिवसांनी फळे काढणीला येतात. परभणी क्रांती हा वाणी केवडा रोगास बळी पडत नसल्याने इतर वाणांपेक्षा 3 ते 4 आठवडे अधिक काळ पर्यंत फळांची तोडणी करता येते. त्यामुळे अधिक उत्पादन येते. खरीप हंगामात हिरव्या फळांचे उत्पादन हेक्टरी 105 ते 115 क्विंटल निघते तर उन्हाळी हंगामात 75 ते 85 क्विंटल निघते.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे