‘मंत्री तुमचं ऐकत नसतील तर कांदे फेकून मारा, बेशुद्ध झाले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा’

टीम महाराष्ट्र देशा – ‘मंत्री तुमचं ऐकत नसतील. तुमच्या मागण्या मान्य करत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारा,’ असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून बुधवारी कळवण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

‘कांदा प्रश्नावर आमची राज ठाकरेंशी चर्चा झाली. हे सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा. तसेच मंत्री बेशुद्ध झाले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा’, असे राज ठाकरेंनी सांगितल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले