मंत्रालयात शिक्षकांना प्रवेश बंदीचा दावा खोटा -‍ विनोद तावडे

Mantralaya teachers entry banned false - tawde

मुंबई : मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्था हा विषय पूर्णपणे पोलिसांशी संबंधित आहे. कोणत्या व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश द्यावेत व देऊ नयेत या संदर्भात शिक्षणमंत्री म्हणून आपण कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश पोलिस यंत्रणेला दिलेले नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

शिक्षकांना मंत्रालयात प्रवेश देऊ नयेत, अशा सूचनाही कोणत्याही यंत्रणेला दिलेल्या नाहीत. अनेक शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनीधींनी त्यांच्या विविध प्रश्नांसाठी यापूर्वीही शिक्षणमंत्री म्हणून भेट घेतली आहे तसेच आजही आपली मंत्रालयात भेट घेतली आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) तर्फे करण्यात आलेला दावा हा पूर्णपणे खोटा चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे श्री. तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी शिक्षकांना मंत्रालयात प्रवेश नाकारल्याचा दावा टीडीएफचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी केला आहे. याबाबत श्री. तावडे यांनी स्पष्ट केले की, शिक्षकांना मंत्रालयात कोणत्याही प्रकारची प्रवेश बंदी करण्यात आलेली नाही. राज्यातील नागरिक आपल्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने मंत्रालयात येत असतात. मंत्रालयीन सुरक्षा कार्यालयाकडून मिळाल्यानंतर ठराविक व्यक्तिंना प्रवेश देताना पोलिस यंत्रणा आवश्यक ती दक्षता घेत असते.Loading…
Loading...