मानसी म्हणाली…’सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी लहान कपड्यांची काय गरज..?

mansi

मुंबई : सौंदर्य आणि अप्रतिम डान्समुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी मानसी नाईक सतत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. तिचे एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांवर डान्स सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना वेड लावत असते.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत, ज्याद्वारे तिने चाहत्यांना एक महत्त्वाचा आणि सुंदर संदेश दिला आहे. हे फोटो तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये मानसी कमालीची सुंदर दिसतेय. नारंगी रंगाची साडी नेसून, ती पदरासोबत खेळताना दिसत आहे. यातील तिच्या अदा आणि तिची स्माईल अगदी कातिलाना आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही अभिनेत्रीचा हा घायाळ करणारा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. हे फोटो शेअर करत तिने अतिशय लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलंय की, ‘आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी नेहमीच लहान कपड्यांची गरज भासत नाही. साडीमध्येही आपलं सौंदर्य कमाल दाखवू शकतं…बरोबर ना.’ फोटोवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत आणि लाईक्सचाही पाऊस पडत आहे.

मानसी नाईकच्याबद्दल सांगायचे झाले, तर तिने २००७ साली आलेल्या‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. तसेच तिच्या या वक्तव्यामुळे ती अजूनच चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या